देशातील वाढत्या भ्रष्टाचारामुळे भारतीय चिंताग्रस्त - अमेरिकेतील ‘गैलप’ संस्था

Friday, May 20, 2011

वॉशिंग्टन, १९ मे (वृत्तसंस्था) - भ्रष्टाचाराने भारत देश संपूर्णपणे पोखरला गेला आहे. त्याचा सामाजिक, आर्थिक, तसेच मानवी व्यवहारांवरही परिणाम झाला आहे, असे सर्वेक्षण अमेरिकेतील 'गैलप' या संस्थेने केले आहे.
या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार ५० प्रतिशत भारतियांना भ्रष्टाचाराच्या संदर्भात केंद्रशासन करत असलेले प्रयत्न अपुरे वाटतात. तसेच केंद्र शासनाच्या धोरणांमुळेच भ्रष्टाचार फोफावत आहे. अनेक भारतियांना भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी आशाच राहिली नाही. यासंदर्भात भारतातील भ्रष्टाचाराला जनआंदोलनातूनच आळा बसेल, असे 'गैलप'चे मत आहे. ( निधर्मी (अधर्मी) राज्यकर्त्यांनी घोटाळ्यांवर घोटाळे करून देशाला भ्रष्टाचाराच्या खाईत लोटले आहे. हा भ्रष्टाचाराचा भस्मासूर रोखण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे आ [...]



 
 
 

Popular Posts