'२-जी स्पेक्ट्रम' घोटाळा
नवी दिल्ली, २० मे (वृत्तसंस्था) - १ लाख ७६ सहस्त्र कोटी रुपयांच्या २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या प्रकरणी प्रमुख संशयित असलेल्या द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांच्या कन्या कनीमोझी आणि कलैग्नार दूरदर्शन वाहिनीचे मुख्य व्यवस्थापक शरद कुमार यांच्या जामिनाच्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
याचिकेची सुनावणी करतांना न्यायालयाने म्हटले आहे, ''आरोपींवरील लावण्यात आलेले गंभीर आरोप पहाता, आरोपी या प्रकरणी साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे न्यायालय आरोपींची जामिनाची याचिका फेटाळून त्यांना कारागृहात ठेवण्याचे आदेश देत आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी कनिमोझी यांना तात्काळ अटक केली. कनीमोझी यांनी त्यांचा चश्म� [...]