मुंबई, १७ मे - भारताने त्याला हव्या असलेल्या ५० कुख्यात आतंकवाद्यांची सूची दिली आहे. या सूचीतील एक आतंकवादी भारतातच महाराष्ट्रातील ठाणे शहरात रहात आहे. वाजूल कमर खान असे नाव असलेला
हा आतंकवादी ठाण्यातील वागळे इस्टेट येथे त्याची आई, पत्नी आणि ५ मुले यांच्यासह रहात आहे. (ज्याराज्यकर्त्यांना त्याच्या सुरक्षा यंत्रणांना साधी गुन्हेगारांची सूचीही बिनचूक देता येत नाही, ते पाकसारख्या राष्ट्रातून आतंकवाद्यांना कधीतरी भारतात आणून शिक्षा देऊ शकतील का ? ही स्थिती पालटण्यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी राज्यकर्त्यांच्या हाती सत्ता सोपवण्याला पर्याय नाही ! - संपादक) वाजूल खिस्ताब्द २००३ या वर्षी मुलुंड येथे झालेल्या रेल्वे बाँबस्फोटातील आरोपी असून तो सध्या जामिनावर मुक्त झालेला आहे. या बाँबस्फोटात ११ ठार, तर ८२ ज� [...]