सुखाच्या सावल्या साऱ्या कश्या वेडावुनी जाती
जसा मी फोडतो टाहो तश्या ह्या तोडती नाती
जसा मी फोडतो टाहो तश्या ह्या तोडती नाती
कधी वाटे पुढे जावे सुखाला दुःख सांगावे
सुखाची पाहुनी दुःखे अता माझी फुटे छाती
सुखाची पाहुनी दुःखे अता माझी फुटे छाती
उभा कापूर जन्माचा उडाला आरतीआधी
कश्या ह्या सांजवेळेला दिव्यांच्या कोरड्या वाती
कश्या ह्या सांजवेळेला दिव्यांच्या कोरड्या वाती
- सुरेश भट